मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 40 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी मुंबईतील वानखेडेवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि केन विल्यमसन ( Kane Williamson ) यांच्यात नाणेफेक पार पडली. गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय ( Gujarat Titans opt to bowl ) घेतला आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर मागील सामन्यात हैदराबाद संघाने गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे या दोन संघात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.
हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लीगमधील एकमेव पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, पहिल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर, सलग पाच सामने जिंकणाऱ्या हैदराबादला गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी आपली प्रभावी गती कायम ठेवावी लागेल. या संघाने सात सामन्यात दोन पराभव आणि पाच विजयासह गुणतालिकेत 10 गुणांची नोंद करुन तिसरे स्थान पटकावले आहे. या दोन संघांच्या वेगवान गोलंदाजांमध्ये जोरदार लढत होणार आहे. हैदराबादचा युवा भारतीय गोलंदाज उमरान मलिक गुजरातच्या लॉकी फर्ग्युसनच्या 150 किमी प्रतितासच्या वेगाला जवळपास त्याच वेगाने उत्तर देईल.