मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौथा सामना वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. हा सामना नव्याने सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात आणि लखनौ संघाचे नेतृत्व अनुक्रमे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल करत आहेत. आजच्या सामन्यासाटी दोन्ही संघाने आपल्या अंतिम अकरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.