पुणे:गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 57 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मंगळवारी (10 मे) पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि केएल राहुल ( Hardik Pandya and KL Rahul ) यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Gujarat Titans opt to bat ) घेतला आहे.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स संघातील हा दुसरा सामना ( GT vs LSG Second Match ) आहे. या अगोदर झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने पाच विकेट्सने लखनौ सुपरजायंट्स संघावर मात केली होती. त्यामुळे आज होणार सामना रोमांचक होणार यात काही शंका नाही. दोन्ही संघ आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अकरा सामने खेळले आहेत. त्यापैकी आठ सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ 16 गुणांसह आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघ ( Gujarat Titans Team ) देखील तितक्याच सामन्यात तेवढेच विजय आणि पराभव स्विकारुन गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. कारण गुजरात संघाचे नेट रनरेट लखनौ संघापेक्षा कमी आहे.