पुणे:इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 29 सामना रविवारी पार पडणार आहे. हा सामना पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Gujarat Titans vs Chennai Super Kings ) यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई संघ कर्णधार रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja ) नेतृत्वाखाली उतरेल, तर गुजरात टायटन्सचा संघ हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पहिल्यांदाच खेळला जात आहे. कारण गुजरात टायटन्स संघाने यंदाच आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले आहे. दोन्ही संघाच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंत कामगिरी पाहिली, तर दोन्ही संघात खुप फरक आहे. दोन्ही संघानी देखील यंदाच्या हंगामातील प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत दोन गुणांसह 9 व्या स्थानी विराजमान आहे. गुजरात टायटन्सबद्दल ( Gujarat Titans ) बोलायचे, तर या संघाने आतपर्यंत पाचपैकी फक्त एक सामना गमावला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.