अहमदाबाद -गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात आयपीएलचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. पहिल्या सत्रात चॅम्पियन बनणारा तो या स्पर्धेतील दुसरा संघ आहे. (GT vs RR result) रविवारी (दि. 29 मे)रोजी झालेल्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. (2008)मध्ये राजस्थानने पहिल्या सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावले हा योगायोग म्हणावा लागेल. गुजरातने आता राजस्थानच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातचा हा विजय असा मानला जात आहे की, ज्यातून चॅम्पियन संघही धडा घेऊ शकतो. आज आपण आयपीएलच्या पंधरा हंगामातील चकीत करणारी महत्वाची पाच आकडेवारी पाहणार ( Five stats blow your mind ) आहोत
1) शुभम गिल शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि गुजरात टायटन्ससाठी एक बाजू सांभाळली. तथापि, अंतिम चेंडूसाठी त्याच्याकडे इतर योजना होत्या आणि गुजरात टायटन्सला त्यांच्या पहिल्या सत्रात आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्यात मदत करण्यासाठी त्याने ते खास शैलीत पूर्ण केले. यासह तो षटकार लगावत संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
2) क्रिकेट हा संघाचा खेळ आहे. आणि जर आकड्यांचा विचार करायचा असेल तर, वैयक्तिक कामगिरीमुळे तुम्हाला आयपीएल सारखे विजेतेपद मिळत नाही हे दिसून येते. उदाहरणार्थ, आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या संघातील खेळाडू ऑरेंज कॅप जिंकली आहे, असे फक्त दोन वेळा झाले. ज्यामध्ये रॉबिन उथप्पा आणि रुतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत आयपीएलच्या 15 हंगामात आयपीएलचा विजेता ठरणाऱ्या संघातील गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे, असे फक्त तीन वेळा झाले आहे.
यामध्ये सोहेल तन्वीर, आरपी सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर फक्त तीनदाच असे झाले आहे की, प्लेअर ऑफ टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूच्या संघानेच जेतेपद पटकावले आहे. या कामगिरीमध्ये शेन वॉटसन, अॅडम गिलख्रिस्ट आणि सुनील नरेन समावेश आहे.
3) आयपीएलच्या एका हंगामात एकाच संघाकडून ऑरेंज आणि पर्पल कॅप मिळाल्याची केवळ तीनच घटना घडल्या आहेत.
2013: हसी आणि ब्राव्हो (उपविजेता)