महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Final RR vs GT : नाणेफेक जिंकून राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; दोन्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' खेळाडूंना संधी - Sanju Samson

आयपीएल 2022 मधील अंतिम सामना ( IPL 2022 Final ) आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडेल. या सामन्याला रात्री आठला सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

IPL 2022 Final RR vs GT
IPL 2022 Final RR vs GT

By

Published : May 29, 2022, 8:01 PM IST

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाचा थरार शेवटच्या दिवसावर येऊन ठेपला आहे. कारण आज (29 मे) आयपीएल 2022 मधील फायनल सामना ( IPL 2022 FINAL Match ) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना आयपीएलच्या पहिल्या हंगामातील विजेता राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिल्याच हंगामात आणि प्रथमच फायनलमध्ये पोहचलेल्या गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans) संघात खेळला जाणार आहे. तत्पुर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात पार पडली आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ( Rajasthan Royals opt to bat ) निर्णय घेतला आहे.

यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने ( Gujarat Titans Team ) लीग स्टेज शानदार प्रदर्शन सर्वांना आपल्या पहिल्याच हंगामात चकित केले. गुजरात टायटन्सने साखळी फेरीतील 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले. त्यामुळे या संघाने 20 गुणांसह प्लेऑफमध्ये सर्वात प्रथम धडक देताना टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. त्यानंतर आपल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात डेव्हिड मिलरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, राजस्थान रॉयल्स संघाला 7 विकेट्सने नमवत फायनलमध्ये दणक्यात एंट्री मारली. आतापर्यंतच्या अप्रतिम कामगिरीचा अनुभव फायनल सामन्यात झोकून हार्दिक पांड्याच्या ( Captain Hardik Pandya ) नेतृत्वाखालील, आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न साकारण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज असणार आहेत.

पहिल्या हंगामाचा विजेता राजस्थान रॉयल्स संघाला ( Rajasthan Royals Team ) आपल्या पहिल्या विजेतेपदानंतर, तेरा वर्षे काही खास कामगिरी करता आली नव्हती. परंतु आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापासून फ्रँचायझींने संघाची मोट चांगली बांधली. त्यानंतर युवा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने बहारदार प्रदर्शन केले. त्यामुळे संघाने साखळी फेरीतील 14 सामन्यात 9 सामने जिंकत प्लेऑफमध्ये प्रवेश करताना टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केले. ज्यामुळे संघाला त्याचा क्वालिफायर 2 मध्य पोहचण्यासाठी फायदा झाला.

या संघाने पहिला क्वालिफायर-1 सामना देखील गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये या संघाला पराभूत व्हावे लागले आणि फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. परंतु संघ टॉप 2 मध्ये असल्याचा फायदा त्यांना झाला आणि क्वालिफायर 2 खेळण्याची संधी मिळाली. या संधीच सोनं करताना राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 7 विकेट्सने पराभव केले. तसेच मोठ्या थाटात प्रवेश केला. त्याचबरोबर आज गुजरात टायटन्सला पराभूत करून 14 वर्षांनतर पुन्हा एकदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्याचे संजू सेनेचे ( Captain Sanju Samson ) स्वप्न असणार आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मॅककॉय आणि युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी

हेही वाचा -Ipl 2022 Prize Money : आयपीएल फायनल जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या संघालाल मिळणार 'एवढे' पैसे

ABOUT THE AUTHOR

...view details