कोलकाता:इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील एलिमेनेटर सामना बुधवारी (25 मे) ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( RCB vs LSG ) संघात पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाची धुरा फाफ डु प्लेसिस आणि केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे. पावसामुले एक तास उशिराने दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून लखनौचा प्रथम गोलंदाजीचा ( Lucknow Super Giants opt to bowl )निर्णय घेतला आहे.
लखनौ संघाने ( Lucknow Super Giants ) साखळी फेरीत 14 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांना दिल्लीच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली. लखनौचा संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय नोंदवत प्लेऑफमध्ये पोहोचला. या सामन्यात संघाच्या गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( Royal Challengers Bangalore ) फलंदाजी मजबूत आहे आणि लखनौला विजय नोंदवायचा असेल तर त्यांच्या फलंदाजीला रोखावे लागेल. आरसीबीच्या संघात उजव्या हाताचे अनेक फलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत डावखुरा गोलंदाज असलेल्या मोहसीन खानची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळेल. तर पराभूत संघ बाहेर होईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. त्याचबरोबर विजेता संघ क्वालिफायर दोन मध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना करेल.