मुंबई - आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला सुरूवात होण्याआधीच आयपीएल 2022 संबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून यूएई सुरूवात होणार आहे. अशात बातमी समोर आली आहे की, बीसीसीआयने आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघाचा समावेश करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी दोन नव्या संघासाठी ऑक्शन होणार आहे. तर खेळाडूंचा लिलाव पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने 17 ऑक्टोंबर रोजी लिलावाची तयारी केली आहे. दोन नव्या संघासाठी जे दावेदार आहेत. त्यांना या संदर्भात सूचना देण्यात आली आहे. बीसीसीआयने नव्या संघासाठी टेंडर जारी केले होते. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 5 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, सर्व संघ लिलावाआधी आपल्या दोन खेळाडूंना रिटेन करू शकतात. तसेच ते खेळाडूंना आरटीएम नुसार खरेदी करू शकतील. जेव्हा आयपीएलमध्ये 10 संघ होतील. तेव्हा 5-5 संघांची दोन गटात विभागणी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.