महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Dinesh Karthik Love Story : प्रेमात आणि मैत्रीमध्ये मिळाला धोका, परंतु प्रेमाने पुन्हा सावरले - Mohammed Shami

क्रिकेट हा जर-तरचा खेळ नाही, कधी एका बॉलवर कोण सिक्सर मारून हिरो बनेल, तर कधी कोण आउट होऊन झिरो होईल, हे सांगता येत नाही. पण हो, या खेळात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी प्रत्येक खेळाडूने कामगिरी करत राहून तंदुरुस्त राहायला हवे. साधारणपणे 34-35 वर्षांच्या वयात क्रिकेटपटू आउट ऑफ फार्म होत असतात. पण दिनेश कार्तिक सारखे दिग्गज वयाच्या 36व्या वर्षीही अप्रतिम कामगिरी करत आहेत. चला जाणून घेऊया दिनेश कार्तिकच्या आयुष्याशी संबंधित किस्से.

Dinesh Karthik
Dinesh Karthik

By

Published : May 11, 2022, 9:48 PM IST

हैदराबाद:दिनेश कार्तिक नावाच्या युवा यष्टीरक्षकाने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. त्याचे क्रिकेट जीवन उंची गाठत होते आणि 2007 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न केले. दिनेश आणि निकिता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते. दिनेश रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघाचे कर्णधारही होता. तामिळनाडू संघाचा सलामीवीर मुरली विजय हा त्याचा खास मित्र होता, जो नंतर भारतीय संघाचाही भाग बनला.

एके दिवशी निकिता दिनेश कार्तिकचा सहकारी खेळाडू मुरली विजयला भेटली. निकिताला मुरली विजय आवडला. निष्पाप दिनेश कार्तिकला हे लक्षात आले नाही. निकिता आणि मुरली यांच्यात जवळीक वाढू लागली आणि काही वेळातच दोघांचे अफेअर सुरू झाले. दोघांनी उघडपणे भेटायला सुरुवात केली. दिनेश कार्तिक व्यतिरिक्त, संपूर्ण तामिळनाडू संघाला माहित होते की मुरली विजय त्याच्या कर्णधार दिनेशची पत्नी निकिताच्या प्रेमात आहे.

त्यानंतर काय झालं -त्यानंतर 2012 साल आले, जेव्हा निकिता प्रेग्नंट झाली आणि निकिताने सांगितले, हे मूल मुरली विजयचे आहे. यामुळे दिनेश कार्तिकला धक्का बसला. त्याने निकिताला घटस्फोट दिला. घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी, निकिताने मुरली विजयशी लग्न केले आणि अवघ्या तीन महिन्यांनंतर त्यांना एक मूल झाले. त्यादरम्यान दिनेश कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला. तो मानसिक आजारी होऊ लागला, पत्नी आणि मित्र मुरलीची ही फसवणूक तो सहजासहजी विसरू शकत नव्हता. तो मद्यपी झाला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू प्यायला लागला. त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते आणि रणजी ट्रॉफीमध्येही तो अपयशी ठरत होता.

एवढेच नाही तर तामिळनाडू संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेऊन, मुरली विजयला नवा कर्णधार बनवण्यात आले. अपयशाचा काळ इथेच थांबला नाही, त्याला आयपीएलमधील संघातही स्थान मिळाले नाही. त्याने जिमला जाणेही बंद केले. शेवटी दिनेश इतका हतबल झाला की त्याने आत्महत्या करण्याचा विचारही सुरू केला होता.

मग एक दिवस जिममधला त्याचा ट्रेनर त्याच्या घरी पोहोचला. त्याला दिनेश कार्तिक वाईट अवस्थेत सापडला. त्याने कार्तिकला पकडून थेट जिममध्ये आणले. कार्तिकने नकार दिला, पण त्याच्या ट्रेनरने त्याचे ऐकले नाही. भारतीय स्क्वॉश महिला चॅम्पियन दीपिका पल्लीकल देखील याच जिमला जायची. दिनेश कार्तिकची अवस्था पाहून तिने ट्रेनरसोबत दिनेश कार्तिकचे समुपदेशन सुरू केले.

इथून नवे वळन -ट्रेनर आणि दीपिकाच्या मेहनतीला फळ मिळू लागले. आता दिनेश कार्तिक सुधारण्याच्या मार्गावर होता. दुसरीकडे मुरली विजयचा खेळ सातत्याने खालावत चालल्याने त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. नंतर त्याचा खराब फॉर्म पाहता चेन्नई सुपर किंग्जने त्याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ताही दाखवला. दुसरीकडे, दिनेश कार्तिकने दीपिका पल्लीकलच्या पाठिंब्याने नेटवर जोरदार सराव सुरू केला. त्याचा परिणाम दिसू लागला आणि दिनेश कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास सुरुवात केली. लवकरच त्याची आयपीएलमध्ये निवड झाली आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही बनवण्यात आले. तो दीपिकाच्या खूप जवळ आला होता आणि त्याने दीपिकाशी लग्न केले.

क्रिकेटच्या वयानुसार दिनेश कार्तिक आता म्हातारा झाला होता. आता भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंतचे आगमन झाल्यामुळे कार्तिकला समजले की आता त्याची कारकीर्द संपली आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. येथे त्यांची पत्नी दीपिका पल्लीकल गर्भवती राहिली आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. दीपिकाचे स्क्वॅश खेळणेही बंद झाले.

दीपिका आणि दिनेश कार्तिक यांना चेन्नईच्या उच्चभ्रू भागात असलेल्या पोस गार्डनमध्ये बंगला असावा अशी इच्छा होती. 2021 मध्ये, चेन्नईच्या त्याच भागात एक भव्य घर खरेदी करण्याची ऑफर त्याच्याकडे आली. दिनेशने ते विकत घेण्याचे ठरवले. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, दीपिका आणि दिनेश दोघेही क्रीडा जगतापासून जवळपास बाहेरच असताना, एवढा महागडा सौदा कसा पूर्ण करणार? त्यानंतर दिनेशला माहिती मिळाली की महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्जचा यष्टिरक्षक म्हणून संघात परत पाहायचे आहे. आयपीएल 2022 चा लिलाव सुरु झाला. पण यावेळी चेन्नईऐवजी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने त्याला विकत घेतले. दिनेशची पत्नी दीपिका हिनेही खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्या जुळ्या मुलांच्या जन्माच्या अवघ्या 6 महिन्यांनंतर, तिने ग्लासगो शहरातील स्क्वॅशच्या जागतिक स्पर्धेत मिश्र दुहेरीसह महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

इथून आयुष्यात आले एक नवे वळण -दिनेश कार्तिक देखील आपल्या पत्नीच्या यशाने प्रभावित झाला आणि नवीन संघात सामील झाला आणि त्याने 2022 च्या आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करण्यास सुरुवात केली. त्याने एकामागून एक मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या आणि तो या आयपीएलचा सर्वात मोठा फिनिशर मानला जात आहे. गेल्या सामन्यात त्याने आठ चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 30 धावा केल्या होत्या. सामना संपल्यावर जेव्हा दिनेश ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा विराट कोहलीने नतमस्तक होऊन त्याला सलाम केला. आज दिनेश कार्तिक भारतीय टी-20 संघात येण्याचा सर्वात मोठा दावेदार बनला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी दिनेश कार्तिक हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात स्फोटक खेळाडू आहे.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ -आयपीएलच्या या हंगामात मोहम्मद शमी गुजरात टायटन्सचा भाग आहे. शमी आपली धारदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शमीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर शमीचे वैयक्तिक आयुष्य देखील आव्हानांनी भरलेले होते. शमीने 2014 मध्ये मुरादाबादमध्ये हसीन जहाँशी लग्न केले. मात्र आठ वर्षांनंतर हसीन जहाँने मोहम्मद शमीपासून घटस्फोट घेतला.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ

2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंग आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. शमीचे बंगळुरू, पुणे, इंदूर, नागपूर येथील महिलांशी संबंध असल्याचा आरोपही हसीनने केला होता. तसेच हसीनने दावा केला होता की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर शमी दुबईत एका महिलेला भेटायला गेला होता. या आरोपांनंतर शमीला अनेक अडचणींमधून जावे लागले आणि त्याने या मुद्द्यांवर स्पष्टीकरणही दिले. त्यानंतरही शमीने क्रिकेटच्या मैदानावर धमाकेदार पुनरागमन केले.

हेही वाचा -IPL 2022 Updates : रवींद्र जडेजाला दुहेरी फटका; कर्णधारपद गेल्यानंतर आता आयपीएलमधून बाहेर होण्याची टांगती तलवार

ABOUT THE AUTHOR

...view details