मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 50 वा सामना गुरुवारी ( 5 मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघाचा हा दहावा सामना आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) नऊ सामने खेळले आहेत. ज्यापैकी त्यांना चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे या संघाचे आठ गुण असून संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दुसरीकडे हैदराबाद संघाने ( Sunrisers Hyderabad Team ) देखील नऊ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या संघाचे दहा गुण असून गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
आयपीएल इतिहासात दिल्ली आणि हैदराबाद संघांमध्ये आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दिल्लीने 9 आणि हैदराबादने 11 सामने जिंकले आहेत.
दिल्ली संघाबद्दल बोलायाचे, तर पृथ्वी शॉने ( Opener Prithvi Shaw ) सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याला ही गती कायम ठेवता आली नाही, तर डेव्हिड वॉर्नरला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करावे लागेल. मात्र, भुवनेश्वर कुमार, उमरान, टी नटराजन आणि मार्को यानसेन यांच्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांसाठी हे काम सोपे जाणार नाही. सनरायझर्सच्या गोलंदाजांनी आतापर्यंत त्यांच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि ते त्यांच्या संघाचे गुण 10 वरून 12 वर नेण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. दिल्लीसाठी एकच आनंदाची बातमी आहे की, त्यांना पुन्हा दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरचा सामना करावा लागणार नाही. त्याच्या जागी जगदीश सुचितला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.