मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 सामना शुक्रवारी (22 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Delhi Capitals vs Rajasthan Royals ) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला आता कोरोनाचा फटका बसला आहे. वास्तविक, मिचेल मार्शसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या एकूण सहा रुग्ण आढळले आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वीच एक प्रकरण समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात ( DC vs RR Match Venue Change ) आले आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता, मात्र आता हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाणही बदलण्यात आले होते. दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यामुळे, प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाची लागण झालेला सहावा खेळाडू टीम सिफर्ट ( Team Sifert ) आहे.