मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (20 एप्रिल) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. या अगोदर हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाची प्रकरणे आढळली, त्यामुळे प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) आतापर्यंत आयपीएल 2022 मध्ये पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ ( Punjab Kings Team ) सहा सामन्यात तीन विजय आणि तीन पराभवामुळे सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. मागील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कर्णधार मयंक अग्रवाल ( Captain Mayank Agarwal ) खेळू शकला नव्हता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. परंतु आज होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
दिल्ली आणि पंजाबचे हेड टू हेड आकडेवारी -
1. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत एकूण 28 आयपीएल सामने झाले आहेत, त्यापैकी किंग्ज इलेव्हन पंजाबने 15 सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सने 13 सामने जिंकले आहेत.
2. दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या फलंदाजांपैकी डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक 945 धावा केल्या आहेत.