नवी मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील ( Indian Premier League 15th Season ) 58 वा सामना बुधवारी (11 मे) डी. व्हाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यात नाणेफेक पार पडली. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Delhi Capitals opt to bowl ) आहे.
या हंगामातील या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. पहिला सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी धूळ चारली होती. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने कॅपिटल्स ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे या संघाचे चौदा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील तितकेच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाच विजयासह सहा पराभव स्वीकारले आहेत. म्हणून या संघाचे 10 गुण आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.