मुंबई:गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघावर चार विकेट्सने विजय ( Delhi Capitals won by 4 wickets ) मिळवला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. प्रथम पलंदाजी करताना कोलकाता संघाने 9 बाद 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 6 बाद 150 धावा करत विजय मिळवला. यानंतर मॅच विनिंग पारी खेळणाऱ्या रोवमॅन पॉवेलने प्रतिक्रिया ( Reaction by Rowman Powell ) दिली आहे.
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने एका क्षणी 84 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. येथून रोव्हमॅन पॉवेल (33*) याने अक्षर पटेल (24) सोबत सहाव्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या आणि त्यानंतर शार्दुल ठाकूर ( Shardul Thakur ) (8*) सोबत सातव्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी करत संघाला 19 षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत चार गडी बाद राखून विजय मिळवून दिला.
सामना समाप्तीनंतर प्रतिक्रिया देताना रोव्हमॅन पॉवेल म्हणाला, “काही दडपण होते, पण माझा विकेटवर विश्वास होता. माझ्या मते ती चांगली विकेट होती. ही अशी विकेट होती जिथे तुम्हाला क्रीजवर स्थिरावण्यासाठी पाच ते सात चेंडू लागतील. या दरम्यान खेळण्यासाठी तुम्हाला क्रॉस शॉट खेळायचा नव्हता. पण ही विकेट चांगली होती.