मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात आतापर्यंत 24 सामने पार पडले आहेत. पण 25 व्या सामन्यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये कोरोना विषाणूची पहिली केस समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील एका महत्त्वाच्या सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढील सामना शनिवारी 16 एप्रिल रोजी खेळायचा आहे. परंतु त्यापूर्वी संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह ( Patrick Farhart Covid-19 tested positive ) आढळले आहेत.
आयपीएलने जारी केलेल्या मीडिया अपडेटमध्ये असे सांगण्यात आले की, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट ( Delhi Capitals Physio Patrick ) कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते सध्या आयसोलेशनमध्ये आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. सध्या तो संघासोबत प्रवास करणार नाही आणि तो किमान एक आठवडा क्वारंटाईनमध्ये राहू शकतो. याशिवाय, आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण समोर आलेला नाही.