मुंबई :आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( IPL 15th season ) 26 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पंधराव्या हंगामात 36 सामने पार पडले आहेत. हे सर्व सामने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई शहरात पार पडले आहेत. त्याचबरोबर उर्वरित लीग सामने सुद्धा या दोन शहरात होणार आहेत. स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हाच लीग सामने कुठे होतील याबद्दल सांगण्यात आले होते. परंतु प्लेऑफचे सामने कुठे होतील याबाबत बीसीसीआयने सांगितले नव्हते. पंरतु आता याबद्दल देखील माहिती समोर आली आहे.
आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या प्लेऑफ सामन्यात आता 100% प्रेक्षकांच्या उपस्थितीला स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी ( 100% audience attendance allowed ) देण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याला दुजोरा दिला आहे. याशिवाय आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे की, 24 ते 28 मे दरम्यान महिला चॅलेंजर्सचे सामने खेळले जाणार आहेत.
प्लेऑफचे सामने ( IPL 2022 playoff matches ) कोलकाता आणि अहमदाबादमध्ये येथे खेळवले जातील. इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा समावेश असलेल्या एका मोठ्या घडामोडीत, प्ले-ऑफ आणि एलिमिनेटर सामने 24 आणि 26 मे रोजी कोलकात्यात खेळवले जातील, तर दुसरा प्ले-ऑफ आणि अंतिम सामना 27 मे रोजी खेळला जाईल. तसेच अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांची पूर्ण उपस्थिती असेल.