महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Closing Ceremony : आयपीएल 2022 च्या समारोप समारंभात रणवीर आणि रहमानच्या परफॉर्मन्सची धमाल - Tata ipl 2022

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या फायनल मॅचपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रहमान, नीती मोहन, मोहित चौहान आणि रणवीर सिंग यांसारख्या स्टार्सनी धमाल केली. यावेळी भारतीय क्रिकेटची 75 वर्षे साजरी करण्यात आली.

IPL 2022 Closing Ceremony
IPL 2022 Closing Ceremony

By

Published : May 29, 2022, 8:49 PM IST

अहमदाबाद:आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका भव्य समारोप समारंभाचे ( IPL 2022 Closing Ceremony ) आयोजन करण्यात आले होते. आज रात्री आठ वाजता विजेतेपदासाठी सामना सुरू झाला आहे त्याच वेळी, संध्याकाळी 6.25 मिनिटांपासून समारोप सोहळा सुरू झाला होता. हा कार्यक्रम सुमारे 45 मिनिटे चालला आणि सामन्याचा टॉस संध्याकाळी 7.30 वाजता झाला. या सोहळ्यात ए आर रहमान, मोहित चौहान आणि नीती मोहन यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. त्याचवेळी, रणवीर सिंगने आपल्या दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सने स्टेडियममध्ये धुमाकूळ घातला.

आयपीएलने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचा विश्वविक्रम केला -

समारोप समारंभात आयपीएलने सर्वात मोठ्या जर्सीचा विश्वविक्रम केला. समारोप समारंभाच्या आधी संपूर्ण स्टेडियममध्ये जर्सी प्रदर्शित करण्यात आली. आयपीएलच्या सर्व 10 संघांचा लोगो जर्सीवर बनवला आहे. समारोप समारंभ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ), सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गिनीज रेकॉर्डचे प्रमाणपत्र स्वीकारले.

भारतीय क्रिकेटला 75वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव -

समारोप समारंभात भारतीय क्रिकेटला 75वर्षे वर्षे पूर्ण ( Indian cricket completes 75 years ) झाल्याचा सोहळा खास पद्धतीने साजरा करण्यात आला. या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ स्टेडियममध्ये दाखवण्यात आला. 1 मिनिट 8 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटचे खास क्षण दाखवण्यात आले. ए.आर.रहमान यांनी समारोप समारंभाला थिरकवले. जय हो या गाण्यावर संपूर्ण नरेंद्र मोदी स्टेडियम दणाणून गेले होते.

अंतिम सामना पाहण्यासाठी 1 लाख 25 हजार प्रेक्षकांची उपस्थिती -

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals and Gujarat Titans ) यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास 1 लाख 25 हजार प्रेक्षक जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. समारोप सोहळाही सुरू झाला आहे. रणवीर सिंगने इंडिया जीतेगा गाण्यावर धाकड परफॉर्मन्स केला.

हेही वाचा -Ipl 2022 Final Rr Vs Gt : नाणेफेक जिंकून राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; दोन्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' खेळाडूंना संधी

ABOUT THE AUTHOR

...view details