पुणे -आयपीएमधील 49 ( IPL 2022 ) वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( CSK Vs RCB ) यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Chennai Super Kings Win Toss Opt To Bowl ) आहे.
गुणतालिकेचा बंगळुरुचा ( Royal Challengers Bangalore ) संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरुने दहा सामन्यांतील सहामध्ये विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे दहा गुणावर असलेल्या बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुढील काही सामन्यांत अपेक्षित, अशी कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नई संघ ( Chennai Super Kings ) हा गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर अर्थात 9 व्या स्थानी आहे. चेन्नईने 9 सामने खेळले असून, त्यातील 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. प्लेऑफपर्यंत पोहचायचे असेल, तर चेन्नईला विजयात सातत्य ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात प्लेऑफसाठी दोन्ही संघात काँटे की टक्कर होणार आहे.