नवी मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 22 वा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता डीवाय पाटील स्टेडियमवर नवी मुंबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( CSK vs RCB ) संघ आमनेसामने असणार आहेत. सध्या चेन्नई सुपर किंग्स संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ तिसऱ्या स्थानी आहे.
सलग चार पराभव पत्करल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला ( Chennai Super Kings ) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) विरुद्धच्या सामन्यात, खेळाच्या सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी करून त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवावा लागेल. सलग चार पराभवांमुळे गतविजेत्याचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही मान्य केले आहे.
चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईने रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja ) नेतृत्वाखाली आपल्य नावाप्रमाणे कामगिरी केली. जडेजा आतापर्यं नेतृत्व करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू आणि ड्वेन ब्राव्हो सारख्या वरिष्ठ खेळाडूंना संकटाच्या या परिस्थितीत अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. CSK ने आतापर्यंत एका सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. त्यांना आता आरसीबीच्या भक्कम गोलंदाजीचा सामना करावा लागेल, ज्यात फिरकीपटू वानिंदू हसरंगा ( Spinner Vanindu Hasaranga ), डेव्हिड विली आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
युवा फलंदाज रुतुराज गायकवाडलामोठी खेळी साकाराता आलेली नाही. अष्टपैलू मोईन अली ( All-rounder Moin Ali ) आणि शिवम दुबे यांनाही अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. फ्लेमिंगने कबूल केले की, संघाला वेगवान गोलंदाज दीपक चहरची उणीव आहे, जो दुखापतीमुळे कोणत्याही सामन्यात खेळला नाही. “खेळाडूंची उपलब्धता ही एक समस्या आहे आणि आम्ही आतापर्यंत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्व विभागांमध्ये सुधारणांची गरज आहे.