मुंबई : आयपीएल 2022 च्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून सीएसकेने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाब संघाला आमंत्रित केले होते. त्यानुसार पंजाबने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 180 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सीएसके संघाला 181 धावांचे लक्ष्य दिले आहे.
या सामन्याची नाणेफेक जिंकून सीएसकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम पलंदाजी करण्याासठी पंजाब किंग्सला आमंत्रित केले होते. हरप्रीत ब्रार आणि राज अंगद बावा यांच्या जागी वैभव अरोरा आणि जितेश शर्मा ( Vaibhav Arora and Jitesh Sharma ) यांचा पंजाब किंग्ज संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली आणि मयंक अग्रवाल दुसऱ्या चेंडूवर 4 धावा करून बाद झाला. यानंतर भानुका राजपक्षेही दुसऱ्या षटकात 14 धावसंख्येवर 9 धावा करून धावबाद झाला.
येथून लियाम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingston ) शिखर धवनसह संघाची धुरा सांभाळली आणि जोरदार फलंदाजी केली. पॉवरप्लेच्या 6 षटकांनंतर पंजाब किंग्जची धावसंख्या 72/2 होती आणि 10व्या षटकात दोन्ही फलंदाजांनी संघाला 100 च्या पुढे नेले, मात्र त्याच षटकात शिखर धवन 24 चेंडूत 33 धावा करून 109 धावसंख्येवर बाद झाला. लिव्हिंगस्टोनने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु 11व्या षटकात 115 धावसंख्येवर 32 चेंडूत 60 धावा करून तो ही बाद झाला.
जितेश शर्माने 17 चेंडूत 26 धावांची जलद खेळी खेळली, मात्र 15 व्या षटकात तो 146 धावसंख्येवर बाद झाला. 16व्या षटकात पंजाब किंग्जने 150 चा टप्पा ओलांडला, पण त्याच षटकात शाहरुख खानही 11 चेंडूत केवळ 6 धावा काढून बाद झाला. 18व्या षटकात 161 धावसंख्येवर ओडियन स्मिथही अवघ्या 3 धावा करून बाद झाला. राहुल चहरने 8 चेंडूत 12 धावा केल्या, पण 19व्या षटकात तोही 176 धावसंख्येवर बाद झाला. कागिसो रबाडाने 12 चेंडूत 12 धावा करत संघाला 180 पर्यंत नेले. चेन्नईकडून ( Chennai Super Kings ) ख्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी दोन तर ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा -Cricketer Rohit Sharma : 2011 च्या वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याबद्दल रोहित शर्माने दिली मोठी प्रतिक्रिया