महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 MI vs CSK : आयपीएल स्पर्धेतील कट्ट्रर प्रतिस्पर्धी मुंबई आणि चेन्नई आज आमने सामने; चेन्नईसाठी करो या मरोची स्थिती - MI vs CSK

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचे संघ गुरुवारी (12 मे) आयपीएल 2022 मध्ये भिडतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. धोनी आणि कंपनीसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. तो हरला तर त्याच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे दरवाजे बंद होतील.

MI vs CSK
MI vs CSK

By

Published : May 12, 2022, 3:15 PM IST

मुंबई: गुरुवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल. मुंबई आणि चेन्नई संघातील यंदाचा हा दुसरा सामना आहे. या अगोदर झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला 3 विकेट्सने मात दिली होती.

चेन्नई सुपर किंग्ज संघ ( Chennai Super Kings team ) 11 पैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने चालू मोसमात 11 पैकी केवळ दोनच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तळाच्या स्थानावर आहेत आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ आहे.

सीएसकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात अष्टपैलू खेळ दाखवला आणि दिल्लीविरुद्ध मोठा विजय नोंदवला. संघातील डेव्हॉन कॉनवे आणि रुतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी केली असून मधल्या फळीतील इतर फलंदाजांनीही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली आहे. बॉलिंग युनिटनेही आपली कामगिरी सुधारली आहे आणि गेल्या सामन्यात याचा नमुना आम्हाला दिसला. रवींद्र जडेजाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने संघाला निश्चितच धक्का बसला आहे, परंतु त्याच्या जागी संघाकडे अनेक उत्तम पर्याय आहेत.

सलग आठ पराभवांनंतर मुंबईने दोन सामने जिंकले होते मात्र मागील सामन्यात त्यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. संघाची फलंदाजी सातत्याने फ्लॉप होताना दिसत आहे. मोठ्या नावांनी सातत्याने कमी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादवही स्पर्धेतून बाहेर ( Suryakumar Yadav Rulled out IPL ) झाला आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह गेल्या सामन्यात पाच विकेट्स घेऊन फॉर्ममध्ये परतला असून त्यामुळे संघाला निश्चितच दिलासा मिळेल. डॅनियल सॅमसह इतर गोलंदाजांनाही विजयासाठी चांगली कामगिरी करावी लागेल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, महेश थेक्षाना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, मिशेल सँटनर, तुषार देशपांडे, डीवा प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन, हरी निशांत, एन जगदीसन, सुभ्रांशु सेनापती, प्रशांत सोलंकी, केएम आसिफ, राजवर्धन हंगरगेकर, मथीशा पाथीराना आणि भगत वर्मा.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट, फॅबियन ऍलन, बेसिल थम्पी, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, ट्रिस्टन स्टब्स आणि देवाल्ड ब्रेविस.

हेही वाचा -RR vs DC: राजस्थान रॉयल्सवर दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

ABOUT THE AUTHOR

...view details