मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील आज (गुरुवार) 33 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी डी वाय पाटील स्टेडियमवर साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी या दोन संघातील नाणेफेक कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) यांच्यात पार पडली. नाणेफेक जिंकून रवींद्र जडेजाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत, मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
चेन्नई आणि मुंबई गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी -इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात या दोन सर्वात यशस्वी संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) संघ सहा सामन्यातील फक्त एका सामन्यात विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चेन्नई संघापेक्षा खराब राहिली आहे. कारण मुंबई संघला आपल्या सहा सामन्यापैकी एका ही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.
चेन्नई आणि मुंबई संघात काटेची टक्कर -2008 पासून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात 32 सामने खेळले गेले आहेत. या दोघांच्या मुकाबल्यात नेहमीच मुंबई संघाचा दबदबा राहिला आहे. कारण 32 पैकी 19 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज संघाने 13 सामन्यात विजय संपादन केला आहे. आयपीएल हंगामातील या सामन्याला इतर संघाच्या सामन्यांच्या तुलनेत क्रेझ असते. या दोन्ही संघात नेहमीच काटेची टक्कर पाहायला मिळते.