मुंबई:आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी तेव्हा पासून आजपर्यंतच्या सामन्यांसाठी, स्टेडियमच्या एकूण आसन क्षमतेच्या फक्त 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात आली होती. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता 25 टक्क्याऐवजी 50 टक्के प्रेक्षकांना ( 50 percent audience allowed ) आयपीएलचे सामने स्टेडियमध्ये जाऊन पाहता येणार आहेत. याबाबतची माहिती बुक माय शो ( Book My Show ) या आयपीएलच्या अधिकृत तिकीट पार्टनरने शुक्रवारी दिली आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे सर्व लीग सामने महाराष्ट्रात ( All league matches in Maharashtra ) होत आहे. आता या सामन्यांना चाहते जास्त प्रमाणात हजेरी लावू शकतात. कारण आयपीएल 2022 चा अधिकृत तिकीट पार्टनर बुक माय शोने, 50 टक्के चाहत्यांच्या उपस्थिला परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने 2 एप्रिलपासून सर्व कोविड-19 निर्बंध हटवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांना आता मुंबई आणि पुण्यातील स्टेडियमवर जाऊन सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. या अगोदर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम या सर्व स्टेडियममध्ये केवळ 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.