महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Mega Auction: लिलावासाठी 590 खेळाडूंची नावे जाहीर, जाणून घ्या भारताच्या दिग्गज खेळाडूंची बेस प्राइस - List of Indian players announced

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये काही भारतीय दिग्गज खेळाडूंच्या नावाचा देखील समावेश आहे. तसेच एकूण 590 खेळाडूंसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

Mega Auction
Mega Auction

By

Published : Feb 2, 2022, 1:06 PM IST

नवी दिल्ली- आयपीएल 2022 चा मेगा लिलाव (IPL mega auction) 12 आणि 13 फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्या अगोदर आयपीएल लिलावात सामिल होणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी जाहीर (List of Indian players announced) झाली आहे. ज्यामध्ये बऱ्याच दिग्गज खेळाडूंची नावे आहेत. तसेच यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची देखील नावे सामिल आहेत. यंदा जवळपास 590 खेळाडूंना बोली लावली जाणार (590 players will have to bid) आहे. ज्यामध्ये देशातील आणि परदेशातील खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवनसह अनेक खेळाडू आहेत. यामध्ये चेतेश्वर पुजाराची मूळ किंमत 50 लाख आहे, तर अश्विनची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

मोठे तारे आधीच रिटेन केले-

सध्याच्या टीम इंडियाच्या कोअर ग्रुपमध्ये अनेक खेळाडू आहेत, ज्यांना त्यांच्या संघाने कायम ठेवले आहे. अशी मोजकीच नावे रिलीज केली आहेत. संघांनी रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव यांच्यासह इतर खेळाडूंना आपल्यासोबत ठेवले आहे. या व्यतिरिक्त शुभमन गिल, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या या नव्या संघात सामील झाले आहेत. केएल राहुल 17 कोटींमध्ये लखनऊ संघात, हार्दिक पंड्या 15 कोटींमध्ये अहमदाबाद संघात आणि शुभमन गिल देखील 8 कोटींमध्ये अहमदाबाद संघात सामील झाला आहे.

आयपीएल 2022 या स्पर्धेला मार्च अखेर सुरुवात होणार आहे. त्या अगोदर या स्पर्धेचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला पार पडणार आहे. ही लिलाव प्रक्रिया बेंगलोरमध्ये पार पडेल. यावेळी दहा संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत, जे खेळाडूंसाठी बोली लावतील. टीम इंडियाचे मोठे स्टार्स कोण आहेत, लिलावात कोण सहभागी होत आहेत आणि कोणाची बेस प्राईस किती आहे त्यावर एक नजर टाकू.

भारतीय दिग्गज खेळाडू-

हनुमा विहारी ५० लाख, अजिंक्य रहाणे १ कोटी, कुलदीप यादव १ कोटी, इशांत शर्मा १.५ कोटी, वॉशिंग्टन सुंदर १.५ कोटी, रविचंद्रन अश्विन २ कोटी, शिखर धवन २ कोटी, श्रेयस अय्यर २ कोटी, मोहम्मद शमी २ कोटी, उमेद यादव २ कोटी, इशान किशन 2 कोटी आणि युझवेंद्र चहल 2 कोटी.

ABOUT THE AUTHOR

...view details