अहमदाबाद : आयपीएल 2022 (Indian Premier League 2022) या स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएल 2022 च्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ संघ सहभागी झाल्याने स्पर्धेतील संघाची संख्या दहा झाली आहे. यापैकी अहमदाबाद संघाने बुधवारी आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. अहमदाबाद (Ahmedabad franchise named 'Gujarat Titans') फ्रेंचायझी आता 'गुजरात टाइटन्स' (Gujarat Titans Team) नावाने ओळखला जाईल.
अहमदाबाद फ्रेंचायझीने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरु होण्यापूर्वी आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. अहमदाबाद (Ahmedabad franchise named 'Gujarat Titans') फ्रेंचायझी आता 'गुजरात टाइटन्स' (Gujarat Titans Team) नावाने ओळखला जाईल. जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टाइटन्सचे होम ग्राउंड असणार आहे. गुजरात टाइटन्स हे नाव महत्वकांक्षी भावनेला दर्शवते.