मुंबई:आयपीएल 2022 च्या हंगामाला शनिवार पासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या आयपीएस हंगामात दहा संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन नवीन संघांचा सहभाग आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आणि गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. हे दोन खेळाडू आपापले संघ घेऊन सोमवारी एकमेकांच्या आमने-सामने येणार आहेत आहे. त्यांंचा सामना संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडे मैदानावर सुरु होईल.
आक्रमक अष्टपैलू खेळाडूंनी परिपूर्ण गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स, सोमवारी एकमेकांविरुद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( Indian Premier League ) पदार्पण करताना विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. गुजरातच्या डावाची सुरुवात शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज करू शकतात. जेव्हा दोघेही फॉर्मात असतात तेव्हा ते कोणत्याही गोलंदाजांना घाम फोडतात.
लखनऊ सुपर जायंट्सच्या ताकदीचे रहस्य -चेन्नई, मुंबई आणि अलीकडे दिल्लीचा फॉर्मुला घेत लखनौने भारतीय खेळाडूंचा मजबूत पूल तयार केला आहे. राहुलच्या रुपाने त्याच्याकडे कर्णधार आहे, तसेच एक धडाकेबाज सलामीवीर आहे. त्याचबरोबर, वरच्या फळीत क्विंटन डी कॉकसह ( Quinton de Kock ) मनीष पांडे आणि खालच्या फळीत दीपक हुडा आहे, जे मोठे फटके मारण्यात माहिर आहेत. इतर भारतीय खेळाडूंमध्ये अष्टपैलू कुणाल पांड्या आणि कृष्णप्पा गौतम, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि युवा फिरकीपटू रवी बिश्नोई ( Spinner Ravi Bishnoi ) यांचा समावेश आहे. तसेच अँड्र्यू टाय, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर आणि एविन लुईस हे चांगले परदेशी खेळाडू देखील त्यांच्याकडे आहेत, तर काइल मेयर्स आणि दुष्मंथा चमेरा संघात सामील होऊ शकतात.
कमजोरी -पंजाब किंग्जमध्ये नेतृत्वाची जबाबदारी असल्याने राहुलला अनेकदा फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करावा लागतो. त्याचवेळी डी कॉकलाही फिरकीपटूं विरुद्ध खेळताना अडचण येते. यावेळी पांड्याचा हंगाम फारसा चांगला गेला नाही, तर पांड्याची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही घसरली आहे. तसेच लखनऊमध्ये परदेशी खेळाडूंचो बरेच पर्याय नाहीत आणि पहिल्या पसंतीच्या खेळाडूंसाठी, कोणतेही ठोस बॅक-अप पर्याय नाहीत.
राहुलला नवीन संघात कर्णधार म्हणून आपल्या अधिकारांवर शिक्कामोर्तब करण्याची संधी आहे. याशिवाय बिश्नोईला चांगली कामगिरी दाखवण्याची संधी आहे. पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमुळे स्टॉइनिस सुरुवातीच्या सामन्यांसाठी अनुपलब्ध राहणार आहे, तर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीमुळे होल्डर आणि मेयर्स पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहेत. यासोबतच डी कॉक क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे पहिला सामना खेळू शकणार नाही.