मुंबई: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अगोदर पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा सामना मुंबईला हलवण्यात आला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी ( Delhi Capitals opt to bowl ) करण्याचा निर्णय घेत, राजस्थान रॉयल्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत या हंगामात सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे आठ गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील सहा सामने खेळले असून तीन विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात सहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तसेच दोन्ही संघानी देखील आपल्या मागील सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. ज्यामध्ये दिल्लीने पंजाबचा तर राजस्थानने कोलकात्याचा पराभव करत विजय संपादन केले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातील हेड टू हेड -
1. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत, त्यापैकी डीसीने 12 आणि आरआरने 12 वेळा विजय मिळवला आहे.
2. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतने ( Rishabh Pant ) राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 300 धावा केल्या आहेत.