अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022चा रोमांचक हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे, कारण आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील शेवटचे दोन सामने उरले आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुसरा क्वालिफायर ( IPL 2022 2nd Qualifier ) सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RR vs RCB ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार संजू सॅमसन आणि फाफ डु प्लेसिस यांच्यात पार पडली आहे. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागीन सामन्यातील दोन्ही संघ कायम आहेत.
क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यानंतर, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals ) आज आयपीएल 2022 च्या क्वालिफायर-2 मध्ये फाफ डू प्लेसिसच्या ( Faf du Plessis ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ( Royal Challengers Bangalore ) कडवे आव्हान आहे. चालू आयपीएल हंगामात राजस्थान एक मजबूत संघ म्हणून पुढे आला आहे. त्यांनी स्पर्धेच्या साखळी टप्प्यात अत्यंत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांनी पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. तथापि, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातविरुद्ध रॉयल्सने चांगली कामगिरी केली नाही, विशेषत: दबावाच्या परिस्थितीत त्यांचे गोलंदाज कामगिरी करू शकले नाहीत. आता त्यांचा सामना आरसीबीशी आहे, जे स्पर्धेत योग्य वेळी पात्र ठरण्यात यशस्वी ठरले होते.