महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 1st Qualifier RR vs GT : नाणेफेक जिंकून गुजरातचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; राजस्थान फलंदाजीसाठी सज्ज - Hardik Pandya

आयपीएल 2022 सीझनचा क्वालिफायर-1 मंगळवारी 24 मे रोजी संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या सामन्यात गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्याची नाणेफेक पार पडली आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

RR vs GT
RR vs GT

By

Published : May 24, 2022, 7:16 PM IST

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी (24मे) आयपीएल 2022 मधील पहिला सामना ( First qualifier match ) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला ईडन गार्डन्स येथे सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांच्यात नाणेफेक पार पडली. गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत गुजरातने साखळी टप्प्यात सर्वोत्तम खेळ केला आणि त्यांच्या 14 पैकी 10 सामने जिंकले. तर राजस्थानने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. या आधी दोन्ही संघात एक सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये राजस्थान संघाला 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

आजचा सामना जिंकणारा संघ थेट फायलमध्ये धडक मारेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळेल. परंतु दोन्ही संघ हा सामना जिंकून फायनलचे तिकिट पक्के करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.

हेही वाचा -Nikhat Zareen Interview : 'या' गोष्टीमुळे निखत बनली वर्ल्ड चॅम्पियन, आता नजर ऑलिम्पिक पदकावर...

ABOUT THE AUTHOR

...view details