महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 : आयपीएलचा 15 वा सीझन भारतात; दोन नवे संघ होणार सामील, BCCI ची घोषणा

आयपीएलचा 15 वा सीझन (IPL Season 15) भारतातच खेळवला जाणार आहे, ही घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. शाह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की आयपीएलचा 15 वा सीझन भारतामध्येच खेळवला जाईल. त्यांनी पुढे म्हटले की, 2022 च्या आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ सामील झाल्याने या स्पर्धेचा रोमांच अजून वाढणार आहे. आयपीएल 2022 साठी लवकरच मेगा ऑक्शन (Mega Auction) आयोजित केले जाईल.

IPL season 15
IPL season 15

By

Published : Nov 20, 2021, 7:46 PM IST

मुंबई -आयपीएलचा 15 वा सीझन (IPL Season 15) भारतातच खेळवला जाणार आहे, ही घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. शाह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की आयपीएलचा 15 वा सीझन भारतामध्येच खेळवला जाईल. त्यांनी पुढे म्हटले की, 2022 च्या आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ सामील झाल्याने या स्पर्धेचा रोमांच अजून वाढणार आहे. आयपीएल 2022 साठी लवकरच मेगा ऑक्शन (Mega Auction) आयोजित केले जाईल.

पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीएलचे आयोजन -

आयपीएल 2022 चे (IPL Season 15) आयोजन पुढल्या वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटी खेळवला जाईल. दरम्यान अजूनपर्यंत आयपीएल 2022 चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

आयपीएल-15 मध्ये दोन नव्या टीम सामील -

आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये (IPL Season 15) दोन नव्या टीम सामील झाल्याने स्पर्धेतील संघांची संख्या 10 झाली आहे. दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनौ या दोन नव्या टीम असतील. या दोन संघासाठी नुकतेच ऑक्शन करण्यात आले होते. त्यामध्ये या दोन टीम ऑक्शन (Mega Auction) जिंकून आयपीएलशी जो जोडल्या गेल्या आहेत.

आयपीएल 2022 साठी मेगा ऑक्शन (लिलाव) -

आयपीएल 2022 साठी मेगा ऑक्शन (Mega Auction) करण्यात येणार आहे. ज्यामध्ये फ्रेंचाइजी टीममध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. या संघात नवनवीन खेळाडू दिसून येतील. दोन नवे संघ सामील झाल्यानंतर मेगा ऑक्शनचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये फ्रेंचाइजी टीम केवळ चार खेळाडूंना रिटेन करू शकतात.

कोरोनामुळे आयपीएल 2021 चे दुसरे सत्र युएईमध्ये -

भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने आयपीएल 2021 मध्ये केवळ 29 सामने खेळले गेले. आयपीएल अर्ध्यावरच थांबवून उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले. यामध्ये काही खेळाडूही कोरोना संक्रमित झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details