महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2021: कमी अलविदा ना कहना! अनिल कुंबळे, वसीम जाफर यांनी गायलं गाणं, पाहा व्हिडिओ - वसिम जाफर

व्हिडिओत संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर गाणे गाताना पाहायला मिळत आहेत. दोघांनी 'कमी अलविदा ना कहना' हे गाणं गायलं. कुंबळे आणि जाफर यांनी गायलेल्या गाण्याचा आनंद सर्व संघातील खेळाडूंनी घेतला.

IPL 2021: WATCH Punjab Kings' Anil Kumble, Wasim Jaffer singing old Bollywood songs on Karaoke night
IPL 2021: कमी अलविदा ना कहना! अनिल कुंबळे, वसीम जाफर यांनी गायलं गाणं, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 14, 2021, 9:47 PM IST

दुबई - आयपीएल 2021 चे दुसरे सत्र यूएईत सुरू होणार आहे. यासाठी सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत आणि सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण करून त्यांनी ट्रेनिंग देखील सुरू केली आहे. सराव सत्रात घाम गाळल्यानंतर फ्रेंचायझी आपल्या खेळाडूंना रिलॅक्स करण्यासाठी व्यवस्था करत आहेत. पंजाब किंग्स संघाने आपल्या संघासाठी गाणे गाण्याचा कार्यक्रम ठेवला. या खास कार्यक्रमात मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले.

पंजाब किंग्ससाठी पहिले सत्र चांगले राहिले नाही. पंजाबने आतापर्यंत 8 सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. यासह ते 6 गुणांसह सहाव्या स्थानी विराजमान आहेत. पंजाब किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून आहे. संघ या शर्यतीत पुन्हा उतरण्याआधी, मॅनेजमेंटने आपल्या खेळाडूंना रिफ्रेश करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पंजाब किंग्सचा संघ नेहमी मजेशीर अंदाजासाठी ओळखला जातो. जो खेळाडू या फ्रेंचायझी सोबत जोडला जातो तो, फ्रेंचायझीच्या रंगात रंगून जातो. पंजाब किंग्सने जो गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता, त्याचा एक मजेशीर व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हे शेअर करताना त्यांनी त्याला, पीबीकेएस करा ओके, क्रिकेटचे दोन दिग्गज वेगळ्या विकेटवर, असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओत संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर गाणे गाताना पाहायला मिळत आहेत. दोघांनी कमी अलविदा ना कहना हे गाणं गायलं. कुंबळे आणि जाफर यांनी गायलेल्या गाण्याचा आनंद सर्व संघातील खेळाडूंनी घेतला. दरम्यान, अनिल कुंबळे नेहमी गंभीर मूडमध्ये राहतात. पण त्यांचा हा नविन अवतार चाहत्यांना जाम आवडला आहे. यामुळेच चाहते या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

हेही वाचा -IPL 2021: रोहित शर्माची क्वारंटाइनमध्येच ट्रेनिंग सुरू, मुंबई इंडियन्सने शेअर केले फोटो

हेही वाचा -यॉर्कर स्पेशालिस्ट लसिथ मलिंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details