महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2021 : वानिंदु हसरंगा आणि दुश्मंता चमीराबाबत विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया - दुश्मंता चमीरा

आरसीबी संघाने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रासाठी श्रीलंकेचे वानिंदु हसरंगा आणि दुश्मंता चमीरा यांच्याशी करार केला आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी माघार घेतली. यामुळे आरसीबीने हा निर्णय घेतला आहे.

Wanidu Hasaranga and Dushmantha Chameera have provided new dimension to the team, says Virat Kohli
IPL 2021 : वानिंदु हसरंगा आणि दुश्मंता चमीराबाबत विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया

By

Published : Sep 18, 2021, 7:25 PM IST

दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने श्रीलंकेचे खेळाडू वानिंद हसरंगा आणि दुश्मंता चमीरा यांना आपल्या संघात घेतले आहे. हे दोन खेळाडू आरसीबीत दाखल झाल्याने संघाला आणखी बळकटी मिळाली आहे. याविषयावरून कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली.

विराट कोहलीने दुसऱ्या सत्राला सुरूवात होण्याआधी संघाच्या निळ्या जर्सीचे अनावरण केले. यावेळी त्याने पहिल्या सत्रात खेळलेल्या अॅडम झम्पा आणि केन रिचर्डस यांची आठवण काढली. विराट म्हणाला की, आम्ही संघात बदल केले आहेत. आम्हाला त्यांच्या जागेवर दुसरे खेळाडू मिळाले आहेत. पहिल्या सत्रात आमच्या सोबत असलेले केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांनी दुसऱ्या सत्रासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय समजू शकतो.

अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांच्या जागेवर आम्हाला नवे खेळाडू मिळाले आहेत. वानिंदु हसरंगा आणि दुश्मंता चमीरा यांनी श्रीलंकाकडून खूप क्रिकेट खेळलं आहे. ते परिस्थिती ओळखून तसेच खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळ करण्यात माहीर आहेत, असे देखील विराट कोहलीने सांगितलं.

आरसीबीने पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबी दुसऱ्या सत्रात केकेआरविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 20 सप्टेंबर सोमवारी उभय संघातील हा सामना अबुधाबीत होणार आहे.

जर्सी विकून मिळालेल्या रकमेतून आरसीबी करणार मदत

आरसीबीकडून सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सीची विक्री करण्यात येणार आहे. यातून मिळालेली रक्कम भारतातील वचिंत समाजातील नागरिकांच्या मोफत कोरोना लसीकरणासाठी देण्यात येणार आहे.

हेही वाचा -T20 WC 2021: विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देखील देणार राजीनामा, दिले संकेत

हेही वाचा -विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर कपिल देव नाराज, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details