चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वामध्ये सलामीचा सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने पुढील दोनही सामने जिंकली. विशेष म्हणजे मुंबईने दोन्ही विजय कमी धावसंख्येचा बचाव करताना जिंकले. या दरम्यान, मुंबई इंडियन्सचे पांड्या ब्रदर्स यांचा त्यांच्या पत्नीसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने खेळाडूंना आपल्या कुटुंबियांना सोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे बहुतांश खेळाडू आपल्या कुटूंबियासह स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात पांड्या ब्रदर्सही त्यांच्या पत्नीसोबत राहत आहे. त्यांनी हॉटेलच्या गार्डनमध्ये डान्स केला. त्यांचा हा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे.
हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक, हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्या तसेच कृणालची पत्नी पंखुडी शर्मा हॉटेलच्या गार्डनमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहेत. पांड्या ब्रदर्सने ऑरेंज रंगाचे टी शर्ट घातले आहेत. तर नताशाने नेव्ही ब्लू आणि पंखुडीने स्काय ब्लू रंगाचा टॉप घातला आहे.