महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SRH Vs RCB : रॉयल चॅलेंजर्सचा सलग दुसरा विजय; 6 धावांनी हैदराबादला चारली धूळ

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सहावा सामना आज सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना होत आहे.

IPL 2021 : Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match updates
LIVE SRH Vs RCB : थोड्याच वेळात होणार नाणेफेक

By

Published : Apr 14, 2021, 7:03 PM IST

Updated : Apr 14, 2021, 11:23 PM IST

चेन्नई -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या सहाव्या सामन्यात चेन्नईमध्ये सनरायजर्स हैदराबादला ६ धावांनी पराभवाची धूळ चारली. विराटसेनेने या आयपीएल सत्रात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. हैदराबादने बंगळुरूला 20 षटकात 8 बाद 149 धावांवर रोखले होते. मात्र, हे धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. हैदराबादला केवळ 20 षटकात 9 बाद 143 धावांचा पल्ला गाठता आला.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सहावा सामना आज सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळण्यात आला आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना झाला आहे. विराट सेनेने सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ते स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात होते. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

हैदराबादने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी संदीप शर्मा आणि मोहम्मद नबीला बाहेरचा रस्ता दाखवत त्यांच्या जागेवर शाहबाज नदीम आणि जेसन होल्डरला संधी दिली आहे. दुसरीकडे बंगळुरूने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी रजत पाटीदारच्या जागेवर देवदत्त पडीक्कलला अंतिम संघात स्थान दिलं आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हेड टू हेड रेकॉर्ड -

सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाली आहेत. यात सनरायजर्सने १० सामन्यात विजय मिळवला आहेत. तर विराटचा बंगळुरू संघ ७ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. एक सामना काही कारणास्तव होऊ शकलेला नाही.

सनरायजर्स हैदराबादचा संघ -

डेव्हिड वार्नर (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल ख्रिश्चियन, कायले जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

LIVE UPDATE :-

  • हैदराबादला विजयासाठी १७ चेंडूत ३३ धावांची गरज
  • लागोपाठ दोन फलंदाज बाद.. मनिष पांडे (३८) नंतर अब्दुल समद बाद
  • हैदराबादचा तिसरा फलंदाज तंबूत जॉनी बॅरिस्टो शाबाजच्या गोलंदाजीवर बाद
  • हैदराबादला विजयासाठी २४ चेंडूत ३५ धावांची गरज
  • अर्धशतकानंतर डेविड वॉर्नर बाद, हैदराबादच्या २ बाद ९६ धावा
  • कर्णधार डेविड वॉर्नरचे अर्धशतक पूर्ण
  • १२ षटकात हैदराबादच्या १ बाद ९० धावा, विजयासाठी ४८ चेंडूत ६१ धावांची गरज
  • ६ षटकात हैदराबादचा १ बाद ५० धावा.
  • सनरायजर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू, कर्णधार डेविड वॉर्नर आणि वृद्धीमान साहा ही सलामी जोडी मैदानात
  • हैदराबाद संघासमोर १५० धावांचे आव्हान
  • १४ षटकांनंतर आरसीबीच्या धावसंख्या ४ बाद ९६
  • आरसीबीला लागोपाठ दोन धक्के कर्णधार विराट कोहली आणि ए.बी डिव्हीलियर्सही बाद
  • संघाच्या 47 धावा झाल्या असताना दुसरा बळी, शाबाज अहमद 14 धावांवर बाद
  • बंगळुरूला तिसऱ्या षटकातील पाचच्या चेंडूवर धक्का बसला. सलामीवीर देवदत्त पडीक्कल (११) भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर झेलबाद, नदीमने टिपला झेल
  • हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
  • नाणेफेकसाठी दोन्ही संघाचे कर्णधार थोड्याच वेळात येणार मैदानात
Last Updated : Apr 14, 2021, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details