शारजाह - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. पंजाब 9 सामन्यात 3 विजयासह 6 गुणांची कमाईसह सातव्या स्थानावर आहे. तर हैदराबादचा संघ 8 सामन्यात फक्त 1 सामना जिंकू शकला आहे. त्याची प्ले ऑफ फेरीची आशा जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.
डेथ ओव्हर स्पेशालिष्ट टी नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तो आयसोलेशनमध्ये आहे. त्यांच्या जागेवर हैदराबाद संघाने जम्मू काश्मिरचा गोलंदाज उमरान मलिक याला संघात घेतले आहे. तरीदेखील त्याला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडू शेरफेन रदरफोर्ड याच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे तो बायो बबलमधून बाहेर पडला आहे. टी. नटराजन याच्या संपर्कात आल्याने विजय शंकर देखील आयसोलेशनमध्ये आहे. यामुळे सनरायझर्स हैदराबादकडे जास्त पर्याय नाहीत.
दुसरीकडे पंजाब किंग्सचा संघ विजयी लय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. के एल राहुल आणि मयांक अगरवालच्या रूपाने पंजाबला चांगली सलामी मिळत आहे. यामुळे पंजाब संघात बदलाची शक्यता कमी आहे. पण या सामन्यात फॅबियन एलन ऐवजी ख्रिस गेलला अंतिम संघात स्थान मिळू शकते. शारजाहचे मैदान लहान असून येथे ख्रिस गेल फायद्याचा ठरू शकतो. याशिवाय गोलंदाजीत आदिल रशिदच्या जागेवर रवी बिश्र्नोई किंवा एम अश्विनला अंतिम संघात स्थान मिळू शकते.
- सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य संघ
- डेविड वॉर्नर, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि खलील अहमद.
- पंजाब किंग्सचा संभाव्य संघ
- केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुडा ,फॅबियन ऐलन/ ख्रिस गेल, आदिल रशिद/रवि बिश्वनोई, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि इशान पोरेल.
हेही वाचा -IPL 2021: कोलकात्याचा सात गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय
हेही वाचा -IPL 2021 : सहा गडी राखत चेन्नईचा बंगळुरूवर विजय, गुणतालिकेत सीएसकेची अव्वल स्थानी झेप