मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात बुधवारी रात्री झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा १८ धावांनी पराभव केला. पण या सामन्यात केकेआरने चांगली झुंज दिली. केकेआर संघाचा मालक शाहरूख खानने ट्विट करत संघाचा उत्साह वाढवला.
कुडा... वूडा... शूडा आजच्यासाठी मागे हटू शकतो. माझ मत आहे की, केकेआरने शानदार खेळ केला. (उप्स आम्ही पॉवर प्लेमधील फलंदाजी विसरू शकत असू तर) जबरदस्त कामगिरी बॉईज, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी चांगला प्रयत्न केला. याची सवय करू घ्या. आम्ही जोरदार वापसी करू, अशा आशयाचे ट्विट शाहरूख खानने केले आहे.
दरम्यान, चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर डू प्लेसिसच्या नाबाद ९५ धावा आणि ऋतुराजचा गायकवाडचे अर्धशतकी खेळी याच्या जोरावर २० षटकात ३ बाद २२० धावा फलकावर लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केकेआरचा निम्मा संघ ३१ धावांत तंबूत परतला. तेव्हा आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक या जोडीने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. रसेल बाद झाल्यानंतर पॅट कमिन्सने वादळी खेळी करत सामना केकेआरच्या बाजूने पलटवला होता. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ लाभली नाही. परिणामी केकेआरने सामना गमावला. केकेआरच्या पराभवानंतर संघाचा मालक शाहरूख खान याने ट्विट करत संघाचे मनोबल वाढवले.
हेही वाचा -बॅडमिंटनपरी ज्वाला गुट्टाचे 'शुभमंगल सावधान', दोघांचाही दुसरा घरोबा
हेही वाचा -केकेआर ठरला बाजीगर : मॅच हरली पण मनं जिंकली, कमिंन्स-रसेलने तोडले अनेक रेकॉर्ड