अबुधाबी - येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज डबल हेडरमधील पहिला सामना खेळला जात आहे. दोन युवा कर्णधारांमध्ये हा सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी करण्यासाठी मैदानात उतरेल.
दिल्ली-राजस्थान संघात बदल
दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी मार्कस स्टॉयनिसच्या जागेवर ललित यादवला अंतिम संघात स्थान दिलं आहे. स्टॉयनिसला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे तो या सामन्यात फक्त 7 चेंडू फेकू शकला होता. दुसरीकडे राजस्थान संघाने इविन लुईस आणि ख्रिस मॉरिस यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागेवर तबरेज शम्सी आणि डेविड मिलरला अंतिम संघात स्थान दिले आहे.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन -