चेन्नई -आयपीएल २०२१ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात डबल हेडरमधील पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमध्ये होणार आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताचा आतापर्यंत एका सामन्यात विजय तर एक सामन्यात पराभव झाला आहे. दुसरीकडे बंगळुरूने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.
आजचा सामना जिंकून बंगळुरूचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे कोलकाताचा संघ दुसरा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. यामुळे उभय संघातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. या सामन्याआधी आम्ही तुम्हाला उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि काही खास रेकॉर्ड बद्दल माहिती देणार आहोत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड -
- उभय संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ वेळा समोरासमोर आले आहेत. यात कोलकाता संघाने १५ विजय मिळवले आहेत. तर बंगळुरूचा संघ १२ सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाता संघाचा पगडा भारी वाटत आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने युएईमध्ये झालेल्या मागील आयपीएल हंगामातील दोन्ही सामन्यात कोलकाताचा पराभव केला होता.
- कोलकाताकडून बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक धावा आंद्रे रसेलने केल्या आहेत. त्याने बंगळुरूविरुद्ध खेळताना ९ डावात ३०८ धावा केल्या आहेत.
- बंगळुरूकडून कोलकाताविरुद्ध सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने कोलकाताविरुद्ध ७२५ धावा केल्या आहेत.
- बंगळुरूकडून कोलकाताविरुद्ध सर्वाधिक १४ विकेट्स युजवेंद्र चहलने घेतल्या आहेत.
- कोलकाताकडून बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक १६ गडी सुनील नरेनने बाद केले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -