मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचे ४ परदेशी खेळाडू बाहेर पडले आहेत. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बायो बबलमध्ये मानसिक त्रास होत असल्याच्या कारणाने आणि अँड्र्यू टाय वैयक्तिक कारण देत या हंगामातून बाहेर पडला. त्यामुळे या खेळाडूंना बदली खेळाडू शोधण्याचे काम राजस्थान रॉयल्स करत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संघाने बेन स्टोक्सचा बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी वॅन डेर डुसेन याला संघात घेतलं आहे. तो सध्या बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे ७ दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे.
दरम्यान, रस्सी वॅन डेर डुसेन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. यामुळे त्याची निवड राजस्थानने केली आहे.