महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : बेन स्टोक्सच्या जागेवर कोणाला मिळणार संधी - डेविड मिलर न्यूज

बेन स्टोक्सच्या हाताला पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. हाताच्या बोटाला झालेली ही दुखापत जास्त गंभीर असल्याने तो संपूर्ण आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर डेव्हिड मिलरला अंतिम संघात संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ipl 2021 rajasthan royals who will be playing in replacement of ben stokes playing xi
IPL २०२१ : बेन स्टोक्सच्या जागेवर कोणाला मिळणार संधी

By

Published : Apr 15, 2021, 5:49 PM IST

मुंबई - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर आज सामना रंगणार आहे. या सामन्याला राजस्थानचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स मुकणार आहे. त्यांच्या जागेवर कोणता खेळाडू खेळणार? याची उत्सुकता आहे.

बेन स्टोक्सच्या हाताला पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. हाताच्या बोटाला झालेली ही दुखापत जास्त गंभीर असल्याने तो संपूर्ण आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर आज संघात डेव्हिड मिलरला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पहिल्या सामन्यात स्टोक्स मनन वोहरासोबत सलामीला उतरला होता. दुखापतीमुळे तो नसल्याने आता सामन्याची सुरुवात जोस बटलर करणार आहे. संजू सॅमसनचा जलवा पुन्हा या सामन्यात पाहायला मिळेल अशी आशा चाहत्यांची आहे. स्टोक्सच्या जागी मिलरला संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तो चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरेल अशी चर्चा आहे. तर राहुल तेवतिया आणि शिवम दुबे ऑलराऊंडर म्हणून खेळताना दिसणार आहेत.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघात आज दोन महत्त्वाचे खेळाडू नसतील, असे सांगितले जात आहे. अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्टिजे कोरोनामुळे सध्या हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरणार नाही, अशी चर्चा आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ -

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयंक मार्कंडेय, अँड्रयू टाई, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -

ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरीवाला, एम सिद्दार्थ, टॉम करन आणि सॅम बिलिंग्स.

हेही वाचा -SRH vs RCB : हातचा सामना गमावल्यानंतर हैदराबादच्या संघ मालकाची लेक झाली दु:खी, फोटो व्हायरल

हेही वाचा -विस्डेन पुरस्कार : विराट कोहली गेल्या दशकाचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

ABOUT THE AUTHOR

...view details