नवी दिल्ली - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमध्ये खेळला जात आहे. राजस्थान आणि हैदराबाद हे दोन्ही संघ विजयी मार्गावर येण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या सामन्याआधी हैदराबाद संघाने आपल्या नेतृत्वात बदल केला आहे. त्यांनी डेव्हिड वॉर्नरकडून संघाचे नेतृत्व काढून केन विल्यमसनकडे सोपवले आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. त्यांनी डेव्हिड वॉर्नर, जगदीश सुचित, सिद्धार्त कौल यांना विश्रांती दिली आहे. तर त्यांच्या जागेवर मोहम्मद नबी, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांना अंतिम संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे राजस्थानने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी शिवम दुबे आणि जयदेव उनाडकट यांच्या जागेवर अनुज रावत आणि कार्तिक त्यागीला संघात घेतलं आहे.
राजस्थान वि. हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत १३ सामने झाली आहेत. यातील ७ सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यात राजस्थानचा संघ विजयी ठरला आहे. मागील चार सामन्याचा विचार केल्यास दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकली आहेत.
राजस्थान रॉयल्सचा संघ -