महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

RR Vs DC : अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय - राजस्थान रॉयल्स वि दिल्ली कॅपिटल लाइव्ह

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सातवा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज राजस्थानने दिल्लीला पराभवाची धूळ चारली आहे. राजस्थानच्या डेविड मिलरने सर्वाधिक 62 धावा करून विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

IPL 2021 : Rajasthan Royals vs Delhi Capitals Match updates
LIVE RR Vs DC : नाणेफेकसाठी दोन्ही संघाचे कर्णधार थोड्याचे वेळात येणार मैदानात

By

Published : Apr 15, 2021, 7:13 PM IST

Updated : Apr 15, 2021, 11:28 PM IST

मुंबई -पहिल्या डावाच्या शेवटी दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मॉरिसने तूफानी फलंदाजीन केल्याने राजस्थानने दिल्लीला तीन गडी राखून पराभूत केले. राजस्थानच्या डेविड मिलरने सर्वाधिक 62 धावा करून विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सातवा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज खेळण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात दोन युवा यष्टीरक्षक कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले. ऋषभ पंत दिल्लीचे तर संजू सॅमसन राजस्थानचे कर्णधारपद भूषवत आहे. दिल्लीने स्पर्धेची सुरूवात विजयाने केली. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. तर दुसरीकडे राजस्थानचा पंजाब किंग्जकडून निसटता पराभव झाला आहे. दिल्ली दुसऱ्या तर राजस्थान पहिल्या विजयासाठी मैदानात उतरली आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान-दिल्ली हेड टू हेड आकडेवारी -

आयपीएलमध्ये उभय संघात आतापर्यंत २२ सामने झाली आहेत. यात राजस्थान संघाने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर राहिलेल्या ११ सामन्यात दिल्लीचा संघ विजयी ठरला आहे. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ तोडीस तोड असल्याचे दिसून येते.

राजस्थान रॉयल्सचा संघ -

मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेविड मिलर, जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन सकारिया, जयदेव उनाडकट आणि मुस्तफिजूर रहमान.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -

शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, आर. अश्विन. ललित यादव, कगिसो रबाडा, टॉम कुरेन आणि आवेश खान.

LIVE UPDATE :-

  • दिल्लीला दुसरा धक्का, शिखर धवन बाद (९), उनाडकटच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने घेतला अप्रतिम झेल
  • दिल्लीला दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धक्का, पृथ्वी शॉ (२) जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर झेलबाद, मिलरने घेतला झेल
  • दिल्लीची सलामी जोडी शिखर धवन-पृथ्वी शॉ मैदानात
  • राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
  • नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार थोड्याच वेळात येणार मैदानात
  • उनाडकटने दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं
  • उनाडकटचा भेदक मारा, दिल्लीचे चार फलंदाज माघारी
  • मुस्तफिझुरनं मार्कस स्टॉयनिसला केलं बाद
  • दिल्लीचा पाचवा फलंदाज तंबूत, अर्धशतक करून रिषभ पंत बाद
  • राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचा भेदक मारा, दिल्ली 6 बाद 100 धावा
  • दिल्लीचा 7 फलंदाज तंबूत परतला
  • इंडियन प्रीमियर लीगच्यासामन्यात दिल्लीच्या प्रथम फलंदाजी करत आपले आठ गडी गमावले आहेत.
  • राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजानी दिल्लीचा डाव 147 धावांमध्ये गुंडाळला, जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्ससमोर 148 धावांचे आव्हान आहे.
  • राजस्थान रॉयल्स ने दिल्लीने दीलेल्या 148 धावांचा पाठलाग सुरु केला आहे. राजस्थान रॉयल्सची सुरवात निराशाजनक राहीली आहे. राजस्थान रॉयल्सचे आतापर्यंत 4 फलंदाज तंबूत परतले आहेत.
  • राजस्थानची पाचवी विकेट 42 धावांवर पडली, रीयान पराग बाद
Last Updated : Apr 15, 2021, 11:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details