मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने सोमवारी पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत चांगलीच भरारी घेतली. चेन्नई आणि राजस्थान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले. वाचा नेमके काय बदल झाले.
राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. कारण दोन सामन्यांमध्ये त्यांनी एक विजय मिळवला होता आणि त्यांना एक पराभव पत्करावा लागला होता. पण सोमवारच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.
गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यांनी आपल्या झालेल्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नईचा संघ पोहोचला आहे. तर तिसऱ्या स्थानी दिल्ली आणि चौथ्या स्थानी मुंबई आहे. दोन्ही संघाचे समान ४ गुण आहेत. पण ते नेट रनरेटच्या जोरावर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या स्थानावर आहेत.