महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनाच्या भीतीने खेळाडू IPL मधून माघार घेत आहेत, BCCI म्हणते... - बीसीसीआय

'आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही', असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

ipl 2021 :  players-start-ipl-due-to-fear-of-corona-bcci-said-tournament-will-continue
कोरोनाच्या भीतीने खेळाडू IPL मधून माघार घेत आहेत, BCCI म्हणते...

By

Published : Apr 26, 2021, 7:57 PM IST

मुंबई - देशात दिवसाला ३.५ लाखाहून अधिक नव्या कोरोना रुग्णाची भर पडत आहे. याची धास्ती आयपीएलमध्ये खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंनी घेतली आहे. एक-एक करुन परदेशी खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी परतत आहेत. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या विषयावर बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्त संस्थेला माहिती दिली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ना सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, 'आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेले तरी काही हरकत नाही.'

आतापर्यंत लियाम लिव्हिंगस्टोन, राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यु टाय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतले आहेत.

आयपीएल स्पर्धेसाठी बायो बबल तयार करण्यात आला आहे. तरी देखील भारतातील कोरोना स्थिती पाहता खेळाडू चिंतेत आहेत, असे कोलकाता नाईट राइडर्स संघाचा मेंटॉर डेव्हिड हसी याने सांगितले.

दरम्यान, आयपीएल स्पर्धा पार पडल्यानंतर ऑस्ट्रेलिया आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू अजूनही स्पर्धेत खेळत आहेत. या व्यतिरिक्त प्रशिक्षक रिकी पाँटिंग, सायमन कॅटिच, समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लिसा स्थळेकर आहेत.

हेही वाचा -कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू IPL सोडण्याच्या विचारात - सूत्र

हेही वाचा -IPL २०२१ : पॅट कमिन्सचं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; पीएम केयरला दिली मोठी मदत

ABOUT THE AUTHOR

...view details