महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2021: कार्तिकने काय षटक फेकले, दिग्गजांकडून कार्तिक त्यागीचे कौतुक - जसप्रीत बुमराह

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कार्तिक त्यागीने अखेरच्या षटकात धारदार गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. यानंतर त्याचे जसप्रीत बुमराह, डेल स्टेन, हरभजन सिंगसह अनेक खेळाडूंनी कौतुक केले आहे. कार्तिक त्यागी जसप्रीत बुमराहला हिरो मानतो आपल्या आदर्शाकडून झालेले कौतुक पाहून कार्तिक भारावला आहे.

IPL 2021: Peers hail Kartik Tyagi for heroic final over
IPL 2021: कार्तिकने काय षटक फेकले, दिग्गजांकडून कार्तिक त्यागीचे कौतुक

By

Published : Sep 22, 2021, 3:38 PM IST

दुबई - आयपीएल 2021 मध्ये मंगळवारी चाहत्यांना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात अखेरच्या षटकात विजय मिळवला. विजयाचा हिरो ठरला युवा गोलंदाज कार्तिक त्यागी. या सामन्यानंतर पंजाब किंग्सच्या फलंदाजांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तर दुसरीकडे कार्तिक त्याची कौतुक होत आहे. यात आजी माजी खेळाडूंनी देखील कार्तिकच्या गोलंदाजीचे कौतुक केलं आहे.

कार्तिक त्यागीने डेथ ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी करत आपल्या संघाला हंगामातील चौथा विजय मिळवून दिला. यानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कार्तिक त्याची कौतुक केले. विशेष म्हणजे कार्तिक बुमराहला आपला हिरो मानतो. कार्तिकच्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब किंग्सचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला. राजस्थानने पंजाबला 186 धावांचे आव्हान दिले होते. पण पंजाबच्या संघाला 4 बाद 183 धावांपर्यंत मजल मारता आली.

राजस्थानच्या विजयात हिरो ठरलेल्या कार्तिक त्यागीने अखेरच्या षटकात 1 धाव देत निकोलस पूरन आणि दीपक हुड्डा यांची विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पंजाबला अखेरच्या षटकात 4 धावांची गरज होती. पण कार्तिक त्यागीने भेदक गोलंदाजी करत संघाला विजय मिळून दिला. यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की, काय अखेरचे षटक होते कार्तिक त्यागी. दबावात स्वत:ला शांत ठेवणे आणि संघासाठी योगदान देणे. शानदार खेळ. खूप प्रभावी खेळ, अशा शब्दात जसप्रीतचे कौतुक केले आहे. बुमराहने केलेले कौतुकाला कार्तिक त्यागीने देखील उत्तर दिलं. त्याने बुमराहच्या ट्विटला रिट्विट करत आपल्या हिरोकडून झालेले कौतुक ऐकणे खूप चांगलं वाटतं, असे म्हटलं आहे.

बुमराहशिवाय दिग्गज गोलंदाज डेन स्टेन याने देखील कार्तिक त्यागीचे कौतुक केले आहे. आतापर्यंतचे हे शानदार अखेरचे षटक आहे, असे स्टेनने म्हटलं आहे. याशिवाय हरभजन सिंग याने देखील कार्तिक त्यागीचे कौतुक केले आहे. राजस्थानला हा विजय महत्वाचा होता. या विजयासह राजस्थानचा संघ गुणतालिकेत 5व्या स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा -IPL 2021: राजस्थान रॉयल्स 185 वर ऑलआउट; अर्शदीपने घेतले 5 विकेट

हेही वाचा -शेवटच्या षटकात फिरला सामना, राजस्थानचा पंजाबवर दोन धावांनी विजय

ABOUT THE AUTHOR

...view details