महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

PBKS vs SRH : हैदराबादने नाणेफेक जिंकली, पंजाबची प्रथम फलंदाजी - Punjab Kings squad today

शारजाहमध्ये पंजाब आणि हैदराबाद यांच्यात होत असलेल्या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब संघात ख्रिस गेलची वापसी झाली आहे. तर दुसरीकडे हैदराबादने आपला मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे.

IPL 2021: PBKS vs SRH : Sunrisers Hyderabad have won the toss and have opted to field
PBKS vs SRH : हैदराबादने नाणेफेक जिंकली, पंजाबची प्रथम फलंदाजी

By

Published : Sep 25, 2021, 7:06 PM IST

Updated : Sep 25, 2021, 7:46 PM IST

शारजाह - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. शारजाहमध्ये हा सामना होत असून या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दरम्यान, पंजाब संघाला प्ले ऑफ फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

सनरायझर्स हैदराबादने मागील सामन्यातील आपला संघ कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्स संघाने संघात 3 बदल केले आहेत. त्यांनी फॅबियन एलेन, आदिल रशिद आणि इशान पोरेल यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागेवर त्यांनी नॅथन एलिस, ख्रिस गेल आणि रवी बिश्र्नोईला अंतिम संघात स्थान दिले आहे.

पंजाब-हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड -

उभय संघात आत्तापर्यंत 17 सामने झाली आहेत. यात हैदराबाद संघाने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबचा संघाला अवघ्या 5 सामन्यात विजय मिळवता आला आहे. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघ पंजाबवर भारी असल्याचे दिसते.

सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेईंग इलेव्हन -

डेविड वार्नर, रिद्धिमान साहा, केन विल्यमसन (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि खलील अहमद.

पंजाब किंग्स प्लेईंग इलेव्हन -

के एल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, एडन माक्ररम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, रवि बिश्नोई, मुहम्मद शमी, हरप्रीत बराड, अर्शदीप सिंह आणि नॅथन एलिस.

हेही वाचा -'वाळू वादळा'नंतर अखेर टॉस चेन्नईने जिंकला, आरसीबी फलंदाजीसाठी सज्ज

हेही वाचा -IPL 2021 : सहा गडी राखत चेन्नईचा बंगळुरूवर विजय, गुणतालिकेत सीएसकेची अव्वल स्थानी झेप

Last Updated : Sep 25, 2021, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details