महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड - मुंबई वि. हैदराबाद ड्रीम ११

आयपीएलच्या १४व्या हंगामात आज ९वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.

ipl 2021 : Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad match previews
IPL २०२१ : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड

By

Published : Apr 17, 2021, 12:11 PM IST

चेन्नई -आयपीएलच्या १४व्या हंगामात आज ९वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. मुंबईने खेळलेल्या २ सामन्यांपैकी एका सामन्यात त्यांचा पराभव तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे हैदराबादला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ विजयी सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहे. कोलकात्याला नमवून विजयाची लय सापडलेला मुंबई संघ दुसऱ्या विजयाच्या आशाने मैदानात उतरेल.

मुंबई इंडियन्स

मुंबई बंगळुरुविरुद्धचा पहिला सामना शेवटच्या चेंडूवर गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोमांचक विजय मिळवला. वास्तविक मुंबईने दुसऱ्या सामन्यात फार काही चांगलं प्रदर्शन केलं नाही किंवा जास्त धावा केल्या नाही पण मुंबईच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिला, असे म्हणता येईल. हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर काही बदल झालाच तर मार्को जेन्सनच्या ऐवजी नॅथन कुल्टर नाईलला अंतिम संघात संधी मिळू शकते.

सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबादसाठी या हंगामाची सुरुवात चांगली राहिली नाही. सुरुवातीचे दोन्ही सामने हैदराबादने गमावले आहेत. हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. हैदराबादचा आशेचा किरण केन विल्यमसन आणखीही पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे तो बॅक बेंचवर बसून आहे. त्याला संपूर्ण ठीक व्हायला आणखीही एक आठवडा लागू शकतो. अशातच आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद संघात फलंदाजीमध्ये काही बदल दिसू शकतात. आजच्या सामन्यामध्ये मनीष पांडे किंवा साहा या दोघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, नाथन कूल्टर नाइल/मार्को जेनसन.

सनरायजर्स हैदराबादचा संभाव्य संघ -

डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, प्रियम गर्ग, केदार जाधव, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम.

हेही वाचा -BCCI वार्षिक करार: विराट, रोहित आणि बुमराह मालामाल; जाणून घ्या सर्व खेळांडूचा पगार

हेही वाचा -IPL 2021 :CSK vs PBKS : दोन्ही किंग्जमध्ये चेन्नईच 'सुपर', पंजाबवर ६ विकेट्सनी मात

ABOUT THE AUTHOR

...view details