महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२१ : रोहितवर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, मुंबईच्या अडचणीत वाढ

By

Published : Apr 21, 2021, 12:36 PM IST

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात षटकाची गती संथ राखल्याने कर्णधार रोहित शर्माला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ipl-2021-mumbai-indians-captain-rohit-sharma-fined-rs-12-lakh-may-get-ban-in-future
IPL २०२१ : रोहित एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, मुंबईच्या अडचणीत वाढ

चेन्नई -दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला आहे. त्याला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात षटकाची गती संथ राखल्याने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, रोहितने ही चूक पहिल्यांदा केली त्यामुळे त्याला दंडाची शिक्षा झाली आहे. पण ही चूक रोहितकडून पुन्हा झाल्यास त्याच्यावर एक सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ९ बाद १३७ धावा केल्या. यात रोहित शर्मा (४४), सूर्यकुमार यादव (२४), इशान किशन (२६) व जयंत यादव (२३) यांनी आपले योगदान दिले. पण हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून बाद झाले. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अनुभवी अमित मिश्राने २४ धावांत ४ विकेट्स घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याला आवेश खानने २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेत चांगली साथ दिली.

मुंबईने दिलेल्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन (४५), स्टीव्ह स्मिथ ३३), ललित यावद (नाबाद २२) आणि शिमरोन हेटमायर (नाबाद १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीने १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.

हेही वाचा -IPL २०२१ : पंजाब-हैदराबाद यांच्यात आज लढत

हेही वाचा -महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details