मुंबई - मुंबई इंडियन्सचा स्टार फिरकीपटू राहुल चहर त्याच्या गोलंदाजी इतकाच त्याच्या हेयर स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याच्या हेयर स्टाईलची भूरळ अनेक चाहत्यांना पडली आहे. प्रत्येक जण त्याच्या हेयर स्टायलिस्ट विषयी जाणून घेण्यास इच्छुक आहे. अशात राहुल चहरने त्याच्या हेयर स्टायलिस्टविषयी माहिती दिली आहे.
राहुल चहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पाहायला मिळत आहे. राहुलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ईशानी आहे.
राहुलने ईशानी सोबतचा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, भेटा माझ्या हेयर स्टायलिस्टला.