मुंबई - आयपीएलच्या चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. पण ऑस्ट्रेलियासह काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रोखली आहे. त्यामुळे घरी कसे जायचे हा प्रश्न खेळाडूंना सतावत आहे. अशात मुंबई इंडियन्स त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार असल्याचे सांगितलं आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने अन्य फ्रँचायझींनाही मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.
मुंबई इंडियन्स त्यांच्या परदेशी खेळाडूंना ज्या चार्टर्ड फ्लाईट्समध्ये मायदेशी पाठवणार ते चार्टर्ड फ्लाईट्स न्यूझीलंड, वेस्ट इंडिज मार्गे दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंना सोबत पाठवण्यास सांगितले आहे.